latest coronavirus numbers


latest coronavirus numbers - गेल्या महिनाभरापासून राज्यातल्या कोविड रुग्णांचा (Coronavirus) आलेख घसरत आहे. आता दिवाळीनंतर (Diwali) मात्र त्यात थोडी वाढ झालेली दिसत आहे. दिवसभरात 5,011 नव्या रुग्णांची वाढ झाली. तर मृत्यूची संख्याही 100वर गेली आहे. 

दिवाळीमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम म्हणून रुग्ण वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दिवसभरात 6,608 कोरोना रुग्णांनी (Coronavirus) कोविडवर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,30,111 एवढी झाली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17,57,520 (latest coronavirus numbers)एवढी झाली आहे.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

दिवाळीच्या (Diwali) काळात सगळ्याच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सरकारने त्याबाबत इशाराही दिला होता.

दरम्यान, कोरोना लस (corona vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आतापर्यंत ज्या कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे, त्या लशी इंजेक्शनमार्फत दिल्या जातील अशा आहेत. मात्र भारतात नाकावाटे घेता येईल अशी लसही तयार केली आहे.

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने (BHARAT BIOTECH) तयार केलेली लस पुढील वर्षात उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षात सिंगल डोस लस उपलब्ध होईल असा दावा कंपनीनं केला आहे. या लशीचे फक्त दोन ड्रॉप नाकात टाकले जातील.

यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोरोना महासाथीत महत्त्वाची भूमिका बजावणारे इतर कोरोना वॉरिअर्सचाही समावेश असेल.  याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक आणि इतर आजार असलेले लोक, वयस्कर व्यक्ती यांचाही समावेश असेल.

लस आल्यानंतरही कोरोनाची महासाथ थांबणार नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रियेसिस यांनी सांगितलं, फक्त लस कोरोना महासाथीला थांबवू शकत नाही.