recharge plan


telecom- जर तुमच्याकडेही रिलायन्स जिओचं प्रीपेड कनेक्शन असेल आणि तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला दररोज 3जीबी डेटा देणाऱ्या जिओच्या तीन शानदार प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत. हे तिन्ही प्लॅन (recharge plan) अनुक्रमे 349 रुपये, 401 रुपये आणि 999 रुपयांचे आहेत.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?

349 रुपयांचा प्लॅन :-

या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा म्हणजे एकूण 84 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ कॉलिंग अनलिमिटेड आहे, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये (recharge plan) दररोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधाही मिळेल.

401 रुपयांचा प्लॅन :-

हा प्लॅन ज्या युजर्सना मोफत Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन हवंय त्यांच्यासाठी उत्तम आहे. या प्लॅनची वैधताही 28 दिवसांची आहे. पण यामध्ये दररोज 3 जीबी डेटाशिवाय 6 जीबी अतिरिक्त म्हणजे एकूण 90 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही रोज 100 मेसेज आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे मिळतात. याशिवाय एका वर्षासाठी Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

999 रुपयांचा प्लॅन :-

जिओच्या या तिसऱ्या प्लॅनमध्येही दररोज 3जीबी डेटा म्हणजेच एकूण 252 जीबी डेटा मिळतो. 84 दिवस इतकी या प्लॅनची वैधता असून यामध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3,000 मिनिटे आणि दररोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.