Reserve Bank of India


लक्ष्मी विलास बँकेनंतर (Lakshmi Vilas Bank) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील मंठा नागरी सहकारी बँकेवर (Mantha Urban Coop Bank) निर्बंध आणले आहेत.  म्हणजेच या बँकेतील (bank) ग्राहक आता कॅश पेमेंट किंवा अन्य व्यवहार करू शकणार नाहीत. आरबीआयने 6 महिन्यांसाठी हे निर्बंध आणले आहेत. 

या सहकारी बँकेच्या (bank) ग्राहकांना 6 महिन्यांसाठी ठेवीचे पैसे काढता येणार नाहीत त्याचप्रमाणे बँक कोणतीही रक्कम घेणार देखील नाही. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या काळात बँकेमार्फत केला जाणार नाही. या बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्याने कर्ज वसुली थकल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले, परिणामी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

मंठा नागरी सहकार बँकेबाबत आरबीआयने (Reserve Bank of India) मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की या बँकेला काही सूचना देण्यात आल्या.  हे निर्देश पालन 17 नोव्हेंबर 2020 रोजी बँक बंद झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी प्रभावी असतील. या सूचनांनुसार ही बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा कर्ज देऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे जुने कर्ज नूतनीकरण केले जाऊ शकत नाही आणि कोणतीही गुंतवणूक देखील करता येणार नाही.

बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. त्यासाठी हा सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे, तोपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे RBI ने म्हटले आहे.

लक्ष्मी विलास बँकेवर देखील आर्थिक संकट

केंद्र सरकारने खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) मोरेटोरियम आणला आहे. 16 डिसेंबरपर्यंत या बँकेवर निर्बंध असणार आहे. केंद्राने या कालावधीत ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या सुविधेवर मर्यादा आणली आहे. आता एका महिन्यासाठी बँकेचे खातेधारक दररोज केवळ 25 हजार रुपये काढू शकतात.