molestation
crime news
- पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणीसोबत काम करणार्‍या तरुणाने घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार  (molestation) केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अभय बनसोडे असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित तरुणी आणि आरोपी हे एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतात. आरोपी साधारणपणे दहा दिवसांपूर्वी तिथे कामाला लागला होता. पीडित तरुणी आधीपासूनच तिथे कामास होती. कामानिमित्त आरोपीची पीडितेसोबत (molestation) ओळख झाली. १३ तारखेला दुपारच्या सुमारास आरोपी तरुण घरी सोडतो सांगत पीडित तरुणीला सोबत घेऊन निघाला होता. मात्र आरोपी तरुणीला एका लॉजवर घेऊन गेला आणि बलात्कार केला. यानंतर तेथून पसार झाला”. (crime news)

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


“तक्रार देण्यासाठी पीडित तरुणीने थेट हडपसर पोलिस स्टेशन गाठलं. पण पोलीस स्टेशनच्या गेटवर येताच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले असता बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद करण्यात करण्यात आलं. पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत,” अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.