job scamsrecruitment- रेल्वे खात्यात तिकीट तपासणीस किंवा क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला ३ लाख ७५ हजारांचा गंडा (job scams) घातला आहे.याप्रकरणी मिनाज मुर्तजा शेख (रा. मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. चैत्राली गणेश गायकवाड (30) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाज आणि चैत्राली एकमेकींच्या ओळखीचे आहेत. मिनाजने चैत्रालीचा भाऊ अक्षय घोडेकरला रेल्वेत तिकीट तपासणीसची नोकरी लावण्याची बतावणी केली.

Must Read

1) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी

2) राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले

3) सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

4) धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान

5) नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं;

त्यासाठी तिने अक्षयकडून 3 लाख 75 हजार रूपये गुगल पेद्वारे (google pay)स्वीकारले. रक्कम स्वीकारूनही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक  (job scams) केल्याप्रकरणी मिनाजविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण तपास करीत आहेत.