punjab-national-bank-atm-rule-will-change

देशात सध्या कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे उद्यापासून (1 डिसेंबर) देशात वित्तीय क्षेत्रासोबत इतरही बदल होणार आहेत. आता ऑनलाइनच्या युगात ऑनलाइन व्यवहाराचे ( online transactions) प्रमाणही वाढत आहे. मागील काही वर्षांत देश भारत डिजीटल इंडियाच्या दिशेने जात आहे.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

फ्रॉडचे प्रमाण वाढले-

आपण या काळात जर ATMमधून पैसे काढायला गेलो तर आपल्याला लगेच पैसे मिळत असतात, पण सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. तसेच एटीएममधूनही पैसे फ्रॉड करून काढण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्याबद्दलच्या तक्रारीही सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळेच आता पंजाब नॅशनल बँके (Punjab National Bank) उद्यापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल करत आहे.

PNB ATMमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल-

1 डिसेंबरपासून PNB 2.0 (PNB, eOBC, eUNI) वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित रोख काढण्याची सुविधा सुरू होणार आहे. 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएनबी 2.0 एटीएममधून एकावेळी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढायचे असतील तर आता त्यासाठी ओटीपी टाकणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता पीएनबी ग्राहकांना रात्रीच्या वेळेत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपीची गरज लागणार आहे त्यामुळे आता पैसे काढताना सोबत मोबाईल असणे गरजचे असणार आहे.

RTGS सुविधा 24×7 असणार-

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुविधा 1 डिसेंबरपासून 24 तास आणि आठवड्याचे सात दिवस उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसच्या माध्यमातून वर्षातील 365 दिवस कधीही पैशांचा व्यवहार करता येणार आहे. आरटीजीएस प्रणाली सध्या महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्याच्या सुट्ट्यासोडून सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु आहे.

नवी रेल्वे सुरु-

मुंबई-हावडाडेली सुपरफास्ट ट्रेन 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मुंबई-हावडा ट्रेन जुन्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. जबलपूर-नागपूर विशेष गाडीही 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लॉकडाउन झाल्यापासून या ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. रेवा स्पेशल आणि सिंगरौली स्पेशल ट्रेनही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याशिवाय झेलम एक्स्प्रेस आणि पंजाब मेलही पुन्हा धावणार आहेत.