Sushant Singh Rajput
crime news
- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput) विविध अँगलने अद्याप सुरु आहे. याप्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये (Drug Connection) एनसीबीकडून (NCB) सखोल चौकशी सुरू आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली होती.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  मृत्यू प्रकरणात सोशल मीडियावर विविध भाष्य करण्यात आली आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर तपास केला जावा अशी मागणी वारंवार केली आहे.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

तर अनेकांनी तपास प्रक्रियेबाबत मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) वर ताशेरे ओढले. मात्र अशाप्रकारे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर केलेली टीका एका युट्यूबरला (YouTuber) चांगलीच महागात पडली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधील (Bihar) एका युट्यूबर विरोधात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. राशिद सिद्दीकी असं या युट्यूबरचं नाव आहे.

सिव्हिल इंजिनीअर असणाऱ्या या युट्यूबरने (YouTuber) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बनावट कंटेट पब्लिश करून फक्त 4 महिन्यात 15 लाख रुपयांची भरभक्कम कमाई केली आहे. राशिद सिद्दीकी FF NEWS नावाचे युट्यूब चॅनेल चालवतो.