protest-against-black-day-karnataka

महाराष्ट्र - कर्नाटक सिमेवर कागलच्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर सवदी यांनी बेळगाव येथे सीमाभागाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महामार्गावर आंदोलन करण्याच्या कारणावरून कागल पोलीस आणि आंदोलकांच्या किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली. 

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

कर्नाटक राज्याचा एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सीमा भागातील मराठी भाषीक काळादिन म्हणून पाळतात. राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केले होते. जोपर्यंत सूर्य - चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकचाच भाग राहील.

महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात येऊन सीमाभागाबाबत वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. सवदी यांच्या या वक्तव्याचे कोल्हापूर जिल्हयासह सीमाभागात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महामार्गावर दूधगंगा नदीजवळ सवदी यांच्या पुतळ्याचे दहन करत कर्नाटकमधील भाजपा सरकारचा निषेध केला. 

सेनेचे सर्व कार्यकर्ते दूधगंगा नदीजवळ जमा झाले. कर्नाटक सरकार आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण संवदी यांच्या विरोधात घोषणा देत सर्वजन दुधगंगा नदीजवळ आले. यावेळी आंदोलकांनी महामार्गावर सवदी यांचा प्रतिकात्मक पूतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात चांगलीच शब्दीक चकमक झाली. संजय पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणूस यांचा अवमान करून कर्नाटकातील भाजपा सरकार मत मिळविण्याचा प्रयत्न करते. 

सवदी यांची खुर्ची डळमळीत झाल्याने ते कोल्हेकुई करत आहेत. शिवसेना मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सवदी यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे आम्ही तेथे येतो. पाहूया कोण कोणाला भारी ठरते असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील, बळीराम पाटील, अलका सावंत, विद्या गिरी आदी उपस्थित होते. यावेळी दिलीप माने, प्रभाकर खांडेकर, अविनाश शिंदे, वैभव आडके यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.