prarthana-behera-shared-her-ethnic

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthna Bhehare) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

स्वत:चे हटके फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. 
त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.
लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच ती लंडनमध्ये या सिनेमाचे शूटिंगसाठी गेले होती. 
छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.
प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
'रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली.
सोशल मीडियावर प्रार्थनाला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.