Poco X3 smartphone


स्मार्टफोन (smartphone) बनवणाऱ्या पोको कंपनीने आपल्या Poco X3 स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट आणलं आहे. या नव्या अपडेटनंतर Poco X3 चे युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग करु शकणार आहेत. 

आतापर्यंत Poco X3 (smartphone) मध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती, त्यामुळे युजर्सकडे कॉल रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता नव्या अपडेटनंतर युजर्सची ही समस्या सुटणार आहे. कंपनीकडून ट्विटरद्वारे या अपडेटबाबत माहिती देण्यात आली आहे. 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, असे शानदार फीचर्स या फोनमध्ये आहेत.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट


स्पेसिफिकेशन्स :-

कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात हा फोन उपलब्ध आहे. 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. 8जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 732G SoC चिपसेट आहे. फोटॉग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर असा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. आवश्यकता असल्यास मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

किंमत :-

6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज : 16,999 रुपये

6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज : 18,499 रुपये

8जीबी रॅम+128जीबी इंटर्नल स्टोरेज : 19,999 रुपये