
Must Read
1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर
2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?
3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर
4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघार
5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर
किंमत :-
Poco M3 ची ग्लोबल किंमत $149 म्हणजे जवळपास 11,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत $169 म्हणजे जवळपास 12,500 रुपये आहे. हा फोन कूल ब्लू, पोको येलो आणि पॉवर ब्लॅक अशी तीन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध असेल. भारतात या फोनच्या लाँचिंगबाबत अद्याप पोको इंडियाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
स्पेसिफिकेशन्स :-
या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट असून अँड्रॉइड (Android) 10 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट आहे. याशिवाय फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर असून 4 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय पोकोच्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, तर 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर मिळेल.
याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही मिळेल. तसेच, 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली Poco M3 मध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पोकोच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, युएसबी टाईप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फोनच्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.