pm-narendra-modi-on-covid19-vaccine

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज कोरोना वॅक्सिन (Corona vaccine) संदर्भात महत्वाची माहीती दिली. राज्यांनी लसीकरणाचा आरखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाविरोधातील लढाई अजून सुरुच असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव

कोरोना वॅक्सिनची किंमत काय असेल ? कशी असेल ? किती डोस असतील हे अजून ठरले नाही असे पंतप्रधान म्हणाले. लस साठा करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज असून लस देण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल असेही ते म्हणाले. पण भारतातील लस अधिक सुरक्षित असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लस आल्यानंतर वितरणासाठी मोहीम राबविण्यात येईल. ही लसीकरण मोहीम दीर्घकाळ चालेल. यासाठी राज्यपातळीवर टास्क फोर्स करावी असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जिल्हा, ब्लॉक पातळीवर लसीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे.