narendra modi


'जवानांच्या अतुलनीय धैर्याला सॅल्यूट करण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नाहीत असे सांगतानाच, यंदाच्या दिवाळीत एक दिवा देशाच्या सीमेचे निर्भिडपणे रक्षण करणाऱ्या जवानांसाठीही लावा,' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी  (narendra modi) यांनी देशातील नागरिकांना केले.

पंतप्रधान मोदी (narendra modi) यांनी ट्विटरवर हे आवाहन केले आहे. मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमाची अलिकडचीच एक ऑडियो क्लिपही ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्या क्लिपमध्ये मोदी यांनी जीवाची बाजी लावून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठीही एक दिवा लावा असे आवाहन केले आहे. सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबियांचेही आपण ऋणी आहोत, असे मोदी यांनी त्यात म्हटले आहे.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी