kabaddi


sports- ‘प्रो कब्बडी लीग’मुळे कबड्डी या खेळात अमुलाग्र बदल झाला. २०१४ पासून सुरु झालेल्या या लीगमुळे आज कबड्डीदेखील (kabaddi) क्रिकेट आणि फुटबॉलप्रमाणेच एक ग्लॅमरस खेळ म्हणून ओळखला जातो. ‘जयपूर पिंक पँथर’ ही टीम प्रो कब्बडी लीगची पहिली विजेता ठरली होती. 

या टीमचा विजयी प्रवास आता रुपेरी पडद्यावर दाखवला जाणार आहे. या टीमवर आधारित एक नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘द सन्स ऑफ सॉईल’ असं या सीरिजचं नाव आहे. ‘जयपूर पिंर पँथर’चा मालक अभिनेता अभिषेक बच्चन याने या आगामी सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर (social media) शेअर केला आहे.(sports)

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

“आयुष्यात इतका उत्साही मी कधीही नव्हतो. या प्रवासानं माझं आयुष्य बदलून टाकलं. हा लक्षवेधी प्रवास तुम्ही देखील पाहावा अशी माझी इच्छा आहे.” अशा आशयाची कॉमेंट लिहून अभिषेकने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर (INSTAGRAM POST) केला आहे. या ट्रेलरमध्ये जयपूर पिंक पँथरची निर्मिती कशी झाली? या टीमनं कसा सराव केला? अभिषेकनं त्यांना मोटिव्हेट कसं केलं? हे दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज येत्या चार डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.