
‘सैराट’ (Sairat) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुने (Rinku rajguru) ट्रेडिशनल लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रिंकू साडीमधील फोटोंमध्ये अतिशय देखणी दिसत आहे. तिच्या या फोटोंवर एका दिवसात लाइक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडला आहे.
सैराट, कागर, मेकअप या मराठी चित्रपटांमध्ये रिंकूने काम केलं आहे. मराठमोळ्या रिंकूने मान्सू मिलान्गय या कन्नड चित्रपटातही अभिनय केला आहे.
पहिल्याच चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तिचे त्यानंतरचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकले नाहीत.
अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती देत असते.
रिंकू ट्रेडिशनल आणि मॉर्डन अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांमध्ये तितकीच सुंदर दिसते.