कोरोनाचं (COVID19) संकट ओढावल्यानं सोन्याच्या भाव (Gold Rate) सध्या गगनाला भिडलेयत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोनं खरेदीसाठी लोकं गर्दी करतायत. अशावेळी सोन्याच्या किंमती कमी असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसलं तरी  फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलंय. 

Must Read

1) मोठी बातमी! अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप...

2) चंद्रकांत पाटील यांचा भाजपाकडून तीव्र निषेध

3) एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू

4) १ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा 'हा' नियम

5) ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता


सध्याच्या काळात सोनं खरेदी (Gold Rate) देखील ऑनलाईन झालीय. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने यासंदरभात माहिती दिली. ३५ टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय. 

डिसेंबर २९१७ मध्ये फोन पे सोनं कॅटेगरी सुरु केली आणि गेल्या ३ वर्षांपासून सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागीदारी केली. यामुळे देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन सोनं खरेदी करता येते. फोन पे वर खरेदी केलेलं सोनं हे २४ कॅरेटचं असली सोनं असतं. जे ग्राहकांच्या बजेटनुसार कधीही खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत १ रुपयांपासून सुरु होते.