petrol & diesel pricepetrol & diesel price- कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १५ वर्षात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या दारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र आता कॅरोमाच्या लसीची चाहूल लागताच कच्च्या तेलाच्या दारात वाढ होऊ लागली आहे. पुढील वर्षी ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरवण्यासाठी ३० नोवेंबर आणि १ डिसेबर ला बैठक होणार आहे. 

त्यामुळे कच्च्या तेलाचे दर ४० वरून ४५ डॉलर पोहचले आहे. त्याचा परिणाम गेल्या आठवड्यापासून पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) किंमतींमध्ये दिसू लागला आहे. हळूहळू पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव


पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कच्च्या तेलाच्या किमती ५८ डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढणार आहे. देशात ४८ दिवसांपासून पेट्रोल (petrol) आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र पाच दिवसांपासून दर सतत वाढत आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल ६ पैसे तर डिझेल १७ पैशानी वाढवले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.५२रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७७.३३रुपये प्रतिलिटर झाले आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किमती वाढण्यास सुरुवात  (petrol & diesel price) झाली. मात्र सप्टेंबरमध्ये या किमती वाढवण्याचे बंद करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती २० डॉलर पर्यंत आल्या होत्या. इंधनाच्या दरातही १. १९ रुपयांनी घाट झाली होती. त्यानंतर किमती स्थिर राहिल्या. मात्र गेल्या आठवड्यापासून पेट्रोल ५३ पैसे तर डिझेल ९५ पैशांनी महाग झाले आहेत.

ऑल इंडिया मोटार ट्रार्न्सपोर्ट काँग्रेसचे नेते मालकीच्या सिंग यांनी इंधन दर वाढीला विरोध केला आहे. कोरोनामुळे सामान्य लोक, वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. निवडणुकीनंतर इंधन दर वाढवण्यावबाबत कोणतेही कारण नाही. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होईल. त्याच फटका सामान्य जनतेलाच बसेल. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दार थांबवावी. याबाबत आपण पंतप्रधान, पेट्रोलियम मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.