street foodstreet food- कोरोनाकाळात पाणीपूरी किंवा बाहेरच्या गाड्यावर विक्री होत असलेले कोणतेही पदार्थ खाण्यासाठी लोकांना धास्ती वाटत होती. कारण कोरोनाची माहामारी आल्यानंतर लोक खाण्यापिण्याच्या सवयींबाबत आणि वैयक्तक स्वच्छतेबाबत खूप जागरूक झाले आहेत. 

आता पाणी विक्रेत्यांनी सुद्धा त्यांचा पॅटर्न बदलेला तुम्हाला दिसून येईल. पाणीपुरी चाहत्यांसाठी एक खास मशिन लावण्यात आलं आहे. या मशिनने अनेकांना आकर्षित केलंय. ही मशीन लावल्यानंतर कोरोना काळात आता लोकांना पाणीपुरी खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येत आहे. 

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका

कोरोनापासून बचावासाठी अमृतसरमध्ये एक असा पाणीपुरीवाला समोर आला आहे, जो  हात न लावता  पाणीपुरी बनवतो. मशीनद्वारे ते पाणीपुरीसाठी लागणारं ६ प्रकारचं पाणी तयार करतो. अमृतसरमधील शास्त्री मार्केटमध्ये पाणीपुरीची ही मशिन लावण्यात आली आहे. या मशिनमुळे ग्राहकांना पाणीपुरी बनवणाऱ्याच्या हातून पाणीपुरीचं (street food)पाणी टाकून घेण्याची गरज लागणार नाही. मशीनद्वारेच ग्राहक स्वत: हवं असलेलं ६ प्रकारचं पाणी टाकून पापीपूरीचा आनंद घेऊ शकतात. 

दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात काम पूर्णपणे बंद होतं. पण आता अनलॉकमध्ये पाणीपुरीचं मशीन लावल्यानंतर, पुन्हा एकदा ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पंजाबमधील हे अशा प्रकारचं पहिलंच मशिन आहे. यापूर्वी अशा मशिनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मशीनमुळे ग्राहकांना बाहेरचं खातानाही कोणतीच धास्ती वाटत नाही. स्वच्छता या ठिकाणी दिसून येते. म्हणून  लोक कोरोनाची भीती न बाळगळता या ठिकाणी पाणीपूरी खाण्याचा आनंद घेऊ