padmini-kolhapure-birthday-special

 हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. आज पद्मिनी यांचा वाढदिवस. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील दमदार भूमिकांनी पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 80 दशकात त्यांची वेगळीच जादू होती. 

बनायचे होते गायिका, अपघाताने बनल्या अभिनेत्री

 त्यांचा जन्म मुंबईत 1 नोव्हेंबर 1965 रोजी झाला.  पद्मिनी यांना ,खरे तर आत्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar)आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यासारखे गायिका बनायचे होते. गायिका बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. यादरम्यान केवळ नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या आणि नंतर सिनेमा आणि अभिनय हेच त्यांचे आयुष्य बनले.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

आजही होतो या गोष्टीचा पश्चाताप

पद्मिनी यांना आजही एका गोष्टीचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याचा खुलासा केला होता. कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना राम तेरी गंगा मैली, एक दुजे के लिए आणि सिलसिला हे तीन सिनेमे आॅफर झाले होते. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. पुढे त्यांनी नाकारलेले हेच सिनेमे सुपरडुपरहिट झालेत. हे सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप आजही त्यांना होता. वेळ मागे नेणे शक्य असते तर मी या सिनेमात काम केले असते, असे पद्मिनी मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

त्या ‘किस’ची झाली होती प्रचंड चर्चा

1980 मध्ये प्रिन्स व पद्मिनी यांच्या किसची प्रचंड चर्चा झाली होती. प्रिन्स भारतभेटीवर आले असतानाची ही घटना. त्यावेळी पद्मिनींनी पुष्पहार घालून प्रिन्स यांचे स्वागत केले होते आणि यानंतर प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. त्यावेळी पद्मिनी केवळ 15 वर्षांच्या होत्या. पद्मिनींनी गालाचे चुंबन घेतल्यामुळे काही क्षण प्रिन्सही अवाक् झाले होते. या चुंबनाची प्रचंड चर्चा झाली होती. सिनेमाच्या इतिहासातील वादग्रस्त घटनांमध्ये आजही या घटनेचा उल्लेख केला जातो.
 

 बोल्ड सीनमुळे चर्चेत

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘गहराई’ हा हिंदी सिनेमा 1980 साली रीलीज झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या बोल्ड सीनमुळे त्या वादातही अडकल्या होत्या. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटामध्येही त्यांनी बोल्ड सीन दिला होता.