entertainment center- 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानं साऱ्यांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनानंतर चाहत्यांनी त्याला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंडही करु लागल्या. त्यातच एका नव्या ट्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा ट्रेंड आहे  #BoycottBingo. 

मुख्य म्हणजे या ट्रेंडच्या माध्यमातून नेटकरी अभिनेता रणवीर सिंग याच्यावर निशाणा साधत आहेत. रणवीरचा सहभाग असणारी एक जाहिरात खटकल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

जाहिरात ठरतेय धोक्याची... या जाहिरातीत रणवीर ranveer singh बिंगो खाताना दिसत आहे. रणवीर साकारणाऱ्या पात्राच्या घरी काही पाहुणे येतात. ही पाहुणे मंडळी त्याला भविष्यासाठीचे बेत विचारतात. तेव्हा तो असं काही उत्तर देतो की पाहुण्यांना पुढं काही सुचतच नाही. मार्स, फैंटम, एलियन अशा शब्दांचा वापर करत तो उत्तरं देतो. (entertainment center)

सोशल मीडियावर या जाहिरातीचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कारण, चाहत्यांच्या मते यातून सुशांतची थट्टा करण्यात आली आहे. सुशांतला अंतराळ आणि Science मध्ये रस होता. या जाहिरातीकडे त्याच संदर्भातून पाहिलं जात आहे. ज्यामुळं आता थेट या जाहिरातीवरच बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. 

बिंगोकडूनही अपेक्षित रोषाचा अंदाज घेत या जाहिरातीवरील डिस्लाईक्स आणि कमेंट्स बंद केल्या आहेत. तेव्हा आता खुद्द रणवीर सिंग या सर्व प्रकरणावरकाही प्रतिक्रिया देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.