भाजपाची (politics party of India)  बी टीम असल्याचा आरोप अनेकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षावर होत आले आहेत. यावर “मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत”, अशा शब्दांत त्यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते बोलत होते.

ओवेसी म्हणाले, “सर्व राजकीय पक्ष माझा आणि माझ्या पक्षाचा मुद्दा बनवून त्याचा राजकीय (politics) फायदा घेण्याच्या प्रयत्नात असतात. बिहारमध्ये काँग्रेसने आमच्यावर आरोप केला की आम्ही भाजपाची बी टीम असून आम्ही मतं कापण्याचं काम केलं. इथं हैदराबादमध्ये काँग्रेस म्हणते ओवेसींना नाही तर आम्हाला मतदान करा. तर भाजपाचं दुसरचं काहीतरी चाललं आहे. 

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

पण मला कुणाचीही फिकीर नाही. या आरोपांप्रमाणे मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत. म्हणजेच विरोधक आम्हाला मुद्दा बनवून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हैदराबादची जनता हे पाहते आहे की, असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष हैदराबादला हरप्रकारे चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब आता जनताच निश्चित करेल.”

अमित शाह यांचे सल्लागार अंधळे-बहिरे आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit shah) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, हैदराबादमध्ये पूर आला त्यावेळी ओवेसी आणि टीआरएस कुठे होते. याचं उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “अमित शाह यांचे जे सल्लागार आहेत ते पूर्णपणे अंधळे-बहिरे आहेत. पूरावेळी अकबरुद्दीन ओवेसींनी साडेतीन कोटींची मदत केली. असदुद्दीन ओवेसी रोज गुडघाभर पाण्यात फिरत होते. आमच्याजवळ याचे फोटो आहेत. आम्ही लोकांचा जीव वाचवत होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करत प्रत्येक पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.”

आपण एक रुपयाही दिला नाही

ओवेसी म्हणाले, “अमित शाह (Amit shah)  हैदराबादच्या जनतेशी खोटं बोलले आणि त्यांना एकाही रुपयाची मदत मिळवून दिली नाही. कर्नाटकातील पूरावेळी त्यांनी निधी दिला अशीच मदत जर हैदराबादच्या पीडितांना मिळाली असती तर प्रत्येक कुटुंबाला ८० हजार रुपये मिळाले असते. पण आपण एकही पैसा दिला नाही आणि आम्हाला प्रश्न विचारता. आम्ही मदत कार्यावेळी ना हिंदू पाहिला ना मुस्लिम. प्रत्येक व्यक्तीची मदत केली, त्यावेळी भाजपा (politics party of India) झोपली होती.