love story part2
भाग 1 वरुन....

Love story- आता तू आराम कर. ’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायची डेअरिंग नाही झाली. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. त्यानंतर बरेच दिवस गेले तरी दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राहुलने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. लेक्चर सुटले कि तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. खूप विचार केल्यानंतर राहुलने तृप्तीसाठी प्रेमपत्र तयार केलं. दोन दिवस ते घेऊन तसाच फिरत होता. डेरिंगच होत नव्हती.

पुढच्या दिवशी तो कॉलेजला लवकर आला. घामेघूम झाला होता. चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. मला वाटलं तृप्तीला विचारायचं आहे म्हणून टेन्शन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, आज ती शाळेत आलीच नाही रे. दिवस बेकार गेला. तिच्या घरासमोर जाऊन आलो. दिसली; पण तिने बघूनही न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते !!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का? मी म्हटले, शांत हो राहुल. ती उद्या कॉलेजला आल्यावर समजेल. 


Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ


दुसऱ्या दिवशी आम्ही तिची कॉलेजच्या गेटबाहेरच वाट पाहत थांबलो होतो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता वर्गात जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी लेक्चर संपतील आणि तिच्याशी बोलतोय असे राहुलला झाले होते. शेवटचं लेक्चर संपल्यानंतर शेवटी आम्ही तिघेजण वर्गात होतो. 

मी राहुलने लिहलेलं पत्र त्याच्या हातात दिलं आणि वर्गाच्या बाहेर निघून गेलो. राहुलने ते पत्र घेतेले आणि तिच्या जवळ गेला. हातातील पत्र देण्यासाठी तिचा हात पकडला. तर तिच्या हातात अगोदरच एक पत्र होतं. ते राहुलसाठी होतं. राहुलने त्याचे पत्र तिच्या हातात दिले आणि तिचे पत्र हातात घेतले. राहुलने थरथरत ते पत्र वाचले आणि आनंदाने उडी मारली. आम्ही समजून गेले कि राहुलला जे हवं होत ते झालं. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते म्हणूनच तर एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला. (Love story)

आम्ही सगळे या दोघांसाठी खुश होतो. पण तृप्तीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं  तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राहुलकडे काही वेळ बघत राहिली आणि जोरात रडायला लागली.  आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. 

तिने स्वतःला सावरत राहुलचा  हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. परत मोठया मोठ्याने रडायला लागली. रडतच ती म्हणाली, ‘माझ्या वडिलांची बदली झाली आहे. आम्हाला उद्याच कर्जत सोडून बदलीच्या ठिकाणी जायचेय..” तिच्या एका वाक्याने आम्हाला धक्काच बसला. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच वर्गामधून बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’ ती म्हणाली सकाळी दहा वाजता निघणार आहोत. 

राहुल नेहमीप्रमाणे त्याच्या घरी न जात माझ्यासोबत माझ्या रूमवर आला. इतका मनात दाटून जे आलं होतं ते मोकळं केलं. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू येणार आहेस का खाली सकाळी ? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने तृप्तीने दिलेले पत्र काढले आणि परत परत वाचत रडत राहिला.

मी यात त्याला धीर देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. मनात आले..सगळे म्हणतात त्याप्रमाणे पहिलं प्रेम नेहमी फसतं, असे का म्हणतात हे त्यावेळी लक्षात आलं..!