Amazon  recruitment



job- ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये नोकरीची संधी आहे. अ‍ॅमेझॉनने त्यांच्यासोबत 20 हजार लोकांना जोडण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉनकडून नोकरी (amazon jobs) देण्यात येणार असून, ही नोकरी फुल टाईम, पार्ट टाईम कोणत्याही प्रकारे करता येऊ शकते. गरज असल्यास केवळ 4 तासही नोकरी करून महिन्याला 70 हजारपर्यंत कमाई करता येऊ शकते.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

तुमच्याच शहरात मिळेल नोकरी -

अ‍ॅमेझॉनने (Amazon ) डिलिव्हरी बॉयच्या नोकरीची घोषणा केली आहे, ज्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकते. कंपनीचे जवळपास सर्वच शहरांमध्ये सेंटर आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

असा करा अर्ज -

डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट अ‍ॅमेझॉनच्या साईटवर https://logistics.amazon.in/applynow अप्लाय करू शकता. त्याशिवाय अ‍ॅमेझॉनच्या कोणत्याही सेंटरवर जाऊन नोकरीसाठी अर्ज दिला जाऊ शकतो.

डिलिव्हरी बॉय या जॉबसाठी दिवसभर काम करावं लागत नाही. एरियानुसार पॅकेट दिलं जातं. डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांत जवळपास 100 ते 150 पॅकेट डिलीव्हर केले जातात. डिलिव्हरी बॉयची, नोकरी करण्यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे. डिलिव्हरी करण्यासाठी बाईक, स्कूटरची गरज आहे. बाईक किंवा स्कूटर इंन्शोरन्स, आरसीसह असावी. अर्ज करणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

डिलिव्हरी बॉयला इतर कंपनीप्रमाणेच, दर महिन्याला वेतन दिलं जातं. कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये वेतन देते. यात पेट्रोलचा खर्च स्वत:चा असतो. एक प्रोडक्ट किंवा पॅकेट डिलिव्हर केल्यानंतर 15 ते 20 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीनुसार, जर कोणी संपूर्ण महिनाभर काम केलं आणि दररोज 100 पॅकेट डिलिव्हर केले, तर सहजपणे 60000 ते 70000 रुपये महिना कमाई होऊ शकते.