social media


कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होण्यामागे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोणताही फोटो किंवा एखाद्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) दिसल्याच तो काही काळातच वाऱ्यासारखा व्हायरल होतं. 

विशेष म्हणजे सोशल मीडियाचा (social media) वापर केवळ व्हायरल गोष्टींसाठीच नसून त्याच्या माध्यमातून अनेक जण पैसेदेखील कमवत असल्याचं दिसून येतं. आता जर कोणी केवळ पायाचे फोटो टाकून पैसे कमवत असल्याचं सांगितलं तर खोटं वाटेल ना? पण हो. एक मॉडेल फक्त तिच्या पायांचे फोटो टाकून लाखो रुपये कमवत असल्याचं समोर आलं आहे.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर

साधारणपणे युट्यूब चॅनेल काढून किंवा एखादा ब्लॉग लिहून अनेक जण पैसे कमवतात. मात्र जॉर्जिया ही २३ वर्षीय मॉडेल घरबसल्या तिच्या पायांचे फोटो सोशल मीडियावर टाकून पैसे कमवत असल्याचं ‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

जॉर्जिया एक मॉडेल व रिसेप्शनिस्ट असून लॉकडाउनच्या काळात घर बसून पैसे कमवण्यासाठी तिने ही भन्नाट आयडिया शोधून काढली. यासाठी तिने एक पेज तयार केलं असून त्यावर तिचे जवळपास ४५ हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स असल्याचं सांगण्यात येतं.

जॉर्जिया तिच्या पायाचे वेगवेगळ्या अॅगलने फोटो काढून ते शेअर करत असते. विशेष म्हणजे हे फोटो विकून ती आठवड्याला ४६० युरो ( जवळपास ४३ हजार) कमावत असल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर महिन्याला ती १ लाख ७० हजार रुपये कमवते.

“खरं तर मला मॉडेल व्हायचं आहे. पण करोना काळात घराबाहेर पडायला भीती वाटते. तसंच घरात राहून न्यूड फोटो किंवा व्हिडीओ टाकून पैसे कमावण्यापेक्षा मला ही आयडिया जास्त योग्य वाटली. त्यामुळे मी माझं पेज तयार केलं आणि त्यावर फोटो टाकू लागले. विशेष म्हणजे लोकांना हे फोटो आवडत असून त्यातून माझी कमाईदेखील होत आहे”, अस जॉर्जियाने सांगितलं.