virat kohli and anushka sharma


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) अलिकडेच एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, विराटचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहं. इतकंच नाही तर त्याच्यामुळे पत्नी अनुष्का शर्मालादेखील अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ट्विटरवर अनुष्का ट्रेण्ड होत आहे.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ


अलिकडेच विराट कोहलीने (virat kohli) त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनुष्काने विराटला खास सरप्राइज दिलं होतं. विशेष म्हणजे या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या विराटने वाढदिवशी फटाके कसे काय फोडले?, असा प्रश्न उपस्थित नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच विराट- अनुष्काकडे प्रायव्हेट जेट असून त्यातूनदेखील मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, असं म्हणत युजर्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर विराटसोबत अनुष्कालादेखील सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतंय.सध्या ट्विटरवर #अनुष्का_अपना_कुत्ता_संभाल आणि अनुष्का असे दोन ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरु आहेत. व्हिडिओ मेसेजनंतर नेटकऱ्यांनी विराट कोहली- अनुष्का यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला विराट?

” हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समाधान घेऊन येवो. लक्षात ठेवा फटके फोडू नका…निसर्गाचं संरक्षण करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. साधारण दिवे आणि मिठाईसह कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करा. देव तुमचं कल्याण करो! स्वत:ची काळजी घ्या!” असं विराट या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे.