olx


crime- ओएलएक्स (olx)वेबसाईटवरून सोफा विकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सोफा खरेदी करतो असे सांगून पैशासासाठी क्युआरकोड पाठवून त्याद्वारे महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विपीनकुमार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने ओलएएक्स (olx) वेबसाईटवर घरातील सोफा विक्रीसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर आरोपीने त्यांना फोन करून सोफा खरेदी करण्याचे सांगत वानवडी भागात फर्निचरचे दुकान असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन फर्निचर विक्रीस होकार दिला. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेला एक क्युआरकोड पाठविला.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

सोफ्याची रक्कम पाठविण्यासाठी तो स्कॅन करण्यास सांगितला. महिलेने तो क्युआरकोड स्कॅन केल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे कमी झाले. दोन वेळा आरोपीने महिलेच्या खात्यामधून 2 लाख 42 हजार रुपये मोबाईल बँकीगद्वारे काढून घेतले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सायबर पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल करून तो दत्तवाडी पोलिसांकडे वर्ग केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.