politics news of maharashtrapolitics news of maharashtra- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं असं मत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं होतं. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, यावरून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.(politics news of maharashtra)

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

“इतिहासात अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यातला दाखल देत आशिष शेलारांनी मराठा महिलेला मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही,” असं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले. 

ते वक्तव्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपाच्या मराठा महिला आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं असल्याचंही ते म्हणाले.