not-excuses-loan-kolhapur

 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. गेल्यावर्षीच्या पूरामुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत मिळाली. यामुळे यंदाचा दिवाळी सण शेतकऱ्यांसाठी दुख:चा आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी गोड सणादिवशीच शेतकऱ्यांना खर्डा खावा लागत आहे. अशी भावाना व्यक्त करत भाजप व किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलनाला सुरुवात केली. भविष्यातही भाजप आणि किसान मोर्चाच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक पोकळ घोषणा केल्या आहेत. कर्जमाफी जाहीर केली, पण ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये जाहीर केले तेही मिळाले नाही. अशात गेल्यावर्षी पुरातून शेतीचे नूकसान झाले त्याचीही रक्कम दिलेली नाही. एकीकडे पिके गेली आणि दुसरीकडे शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी किंवा मदत निधीही दिलेला नाही. त्यामुळे शासनाचा निषेध केला जात असल्याचे भाजप आणि किसान सभेच्यावतीने सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना दु:खात ठेवून दिवाळी साजरी केली जात आहे.  जगाचा पोंशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालीच नाही. पूराच्या नूकसानीची भरपाई दिलेली नाही. काहींना मिळाली तर बहुसंख्य लोकांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही. त्यामुहे शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा आंदोलन कर्त्यांनी निषेध केला. 

यावेळी, किसान मोर्चाचे भगवान काटे म्हणाले, कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटात आली आहे. जगाचा पोंशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. ज्या घोषणा केल्या त्या तात्काळ पूर्ण केल्या पाहिजेत. आज शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. पण देशात सर्वच जण दिवाळी साजरी करत असले तरीही, शेतकऱ्यांना मात्र यंदाची दिवाळी कडू झाली आहे. याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी काटे यांनी केली. यावेळी, हंबीराव पाटील, विठ्ठल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.