ms dhonisports- २०२० वर्ष आणि आयपीएलचा तेरावा हंगाम हा महेंद्रसिंह धोनी (ms dhoni)आणि चेन्नई सुपररकिंग्ज संघासाठी चांगला गेला नाही. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा संघ तेराव्या हंगामात साखळी फेरीतच बाहेर फेकला गेला. गुणतालिकेत चेन्नईला सातवं स्थान मिळालं. 

पुढील हंगामात धोनी खेळणार की नाही अशी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु असताना धोनीने आपण चेन्नईकडून खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. परंतू भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राच्या मते पुढील हंगामात BCCI ने Mega Auction करण्याचा निर्णय घेतल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यायला हवं.

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका


“माझ्या मते पुढील हंगामासाठी लिलाव झाल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यावं. लिलाव झाल्यास पुढील ३ वर्षांसाठी तुम्ही त्या खेळाडूला संघात ठेवू शकता. पण धोनी तीन वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे का?? चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवलं तर त्यांना धोनीला १५ कोटी द्यावे लागतील. 

समजा धोनीने (ms dhoni) २०२२ पासून न खेळण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण त्या तोडीचा खेळाडू मिळणार आहे का?? मेगा ऑक्शनचा हाच फायदा असतो, तुम्ही तुम्हाला हवीतशी टीम तयार करु शकता. धोनीला सोडून दिल्यास पुन्हा RTM कार्डाद्वारे त्याला संघात परत घेण्याचा पर्याय खुला आहे. CSK ने धोनीला सोडलं तर ते त्यांच्यासाठीच चांगलं ठरेल.” आकाश चोप्राने आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात मत मांडलं.

आताच्या आठही संघांपैकी चेन्नईच्या संघाला ऑक्शनची सर्वात जास्त गरज असल्याचंही आकाश चोप्राने म्हटलं. Daddy’s Army म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेन्नईला यंदा अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनुभवी खेळाडूंचं फॉर्मात नसणं संघाला चांगलंच भोवलं. त्यामुळे नवीन वर्षात नव्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंनिशी मैदानात उतरण्याचा धोनीचा कल असणार आहे.