Amol Kolhepolitics- मंदिर उघडण्याच्या (temples open) मुद्यावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पण 'श्रद्धेच्या बाबतीत  राजकारण होत तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी' असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लगावला.

आज डॉ कोल्हे आपल्या नारायणगाव येथील जन्मगावी आले होते तेव्हा त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. 'कोरोनाच्या परीक्षा पाहणाऱ्या काळानंतर थोडासा एक मोकळा श्वास घेण्याची उसंत सगळ्यांना मिळालेली आहे. त्यामुळे घरच्यांसोबतच आपण ही दिवाळी साजरी केली. पण जरी सण असला, सणाचं मांगल्य असलं, सणाचा उत्साह असला  तरी सेलिब्रेशन या झोनमध्ये जाण्याची आपली खरंच मानसिकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. (politics)

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

'श्रद्धेच्या बाबतीत राजकारण होत तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार ने जे काही निर्णय घेतले जे काही काम केल ते स्वागतार्ह होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी कौतुक केलं. आनंद साजरा करताना, सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापरणे, हात धुणे ही त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी तेव्हा कोविडंचं संकट संपेल. सण उत्सव असतील, मंदिरं उघडण्याचा सोहळा असेल या सर्व गोष्टीत हे पाळल जायला हवं, असं आवाहनही कोल्हे यांनी केले.

'मला या श्रेयवादाची कल्पना नाही आणि  त्यावर कोणाविषयी बोलावं असही मला महत्वाचं वाटतं नाही. मात्र, मंदिर जी काही उघडली गेली आहेत, त्यांनतर जी  काही त्रिसूत्री आहे. तिचा अवलंब व्हावा अन्यथा आज जे श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.