rohit pawar
उत्तम संघटन, वक्तृत्व आणि माणुसकी या गुणांमुळे राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री शरद पवार (sharad pawar) यांचे नातू रोहित पवार (rohit pawar)लोकप्रिय आहेत. राजकीय कामगिरीसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना, लाँग ड्राइव्हला (long drive) कोणासोबत जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता.

“मला  (rohit pawar) गाड्यांची विशेष आवड आहे. भावंडांसोबत, ठराविक मित्रांसोबत मी फिरायला जातो. पण लाँग ड्राइव्हसाठी (long drive) मला पत्नी कुंतीसोबत जायला आवडतं. गाडीमध्ये मागे मुलं बसतात आणि थोड्या वेळानंतर त्यांच्यात भांडणं होतात की पुढे कोण बसणार आणि त्यात डेस्टिनेशन कधी येतं हेच कळत नाही. लाँग ड्राइव्हला जायची आवड असली तरी व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळत नाही.”

Must Read

1) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी

2) राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले

3) सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

4) धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान

5) नगरसेवकाला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं;

फावल्या वेळेत फेसबुक (facebook), ट्विटर (twitter) किंवा सोशल मीडिया पाहण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत वेळ घालवणं आवडतं, असंदेखील ते म्हणाले. “मला मुलांसोबत कार्टून बघायला आवडतं. कारण यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो आणि माझ्याही लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर येतात,” असं ते म्हणाले.