ncp-leader-nawab-malik-criticizes-bjp

'भाजपचे (BJP) नेते हे मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसमधून गेलेले आमदार भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यांना टिकवण्यासाठी भाजपकडून ठाकरे सरकार कोसळेल, असं म्हटलं जात आहे. लवकरच काही आमदार हे स्वगृहात प्रवेश करतील आणि त्याबाबत शरद पवार निर्णय घेतील,' असं म्हणत औरंगाबादमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malikयांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे. कितीही चिठ्ठ्या काढल्या, भविष्यवाणी केली, चकवेगिरी केली तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल. मोठ्या संख्येने आमदार स्वपक्षी प्रवेश करतील. फडणवीस यांची सरकार पडणार ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झाले. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते. त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही. त्यामुळे चकवेगिरी करण्यासाठी दानवे साहेब समोर आले आहेत,' असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

मोदींचा दौरा आणि मुख्यमंत्री...

नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यावरही टोलेबाजी केली आहे. 'देशाच्या पंतप्रधानांनी कोव्हिड उत्पादन कंपन्यांस भेट दिली. या भेटीत राज्यशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री येऊ नये याचा फतवा काढला. याचं कारण कळत नाही. मुख्यमंत्र्यांमुळे मुळे कोरोना होईल काय? हे वाटणे योग्य नाही. 8 महिन्यानंतर पंतप्रधान बाहेर निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना घाबरत आहे. मोदींनी कोविडच्या लसीची पाहणी करण्याऐवजी त्यांनी तिकडेच बसून नियोजन केलं असत तर बरं झालं असतं,' असं मलिक म्हणाले.