bharti singh and harsh
drugs case
- बॉलिवूड (bollywood) ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे आणि तिच्या घरात गांजा सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे.

या ड्रग्स (drugs case) पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छापा दरम्यान एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला आहे.

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

बॉलिवूडमध्ये (bollywood) ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.