navneet-ranas-protest-outside-the-jail

आमदार रवी राणा (Ravi Ranaयांना भेटू न दिल्यामुळे कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आमदार रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याची खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाल्याचं कळतं आहे. दुसरीकडे आमदार रवी राणा यांचे कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांवर रात्री तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. विविध मागण्यांसाठी रवी राणा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Must Read

1) मंदिरं उघडण्याच्या निर्णयावर काँगेस नेत्याचा सवाल

2) दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

3) शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुलं, मात्र...

4) ऑस्ट्रेलियाचे माईंड गेम सुरू, स्मिथचा टीम इंडियाला इशारा

5) KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'

6) पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की...

आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना भेटू दिलं जात नसल्याने खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. अनेकदा शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील नवनीत राणा यांनी दिला आहे.