ms dhoni

भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओखळ निर्माण करणारा महेंद्रसिंह धोनी (ms dhoni)सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. एकिकडे माही IPL 2020 आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी दुबईला गेलेला असतानाच दुसरीकडे त्याचं कुटुंब मात्र इथं भारतातच रांची येथे असणाऱ्या त्याच्या फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं गेलं. 

लॉकडाऊनच्या सबंध काळातही तो इथंच वेळ व्यतीत करताना दिसला होता. सोशल मीडियावर (social media)याची झलकही अनेकांनाच पाहायला मिळाली. रांची हे ठिकाण धोनीच्या मनाच्या अगदी जवळचं. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेणारा धोनी याच शहरापासून काहीसा दूर जाऊ शकतो. सध्या माध्यमं आणि क्रीडारसिकांमध्ये याबाबतच्या चर्चांना प्रचंड उधाम आलं आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे धोनीच्या पत्नीनं म्हणजेच साक्षी धोनी हिनं सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो. 

Must Read

1) जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

2) जेलमधून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामीचं शक्तीप्रदर्शन

3) शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

4) HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज पण...

5) रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणाला...

मुंबईतील एका निर्माणाधीन घराचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं. सी- फेसिंग व्ह्यू असणाऱ्या या घराचे फोटो आणि त्यावर साक्षीनं दिलेलं कॅप्शन पाहता धोनी आणि त्याचं कुटुंब आता लवकरच मुंबईत वास्तव्यास येण्याची चिन्हं असल्याचं म्हटलं जात आहे.  

architectural designer शांतनू गर्गनंही हेच फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले. Final Cast of my dream असं लिहित साक्षीनं हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळंच माही (ms dhoni) रांचीतून आता त्याचा मोर्चा मुंबईकडे वळवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.