sports- आयपीएल २०२० चा हंगाम ३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खास ठरला नाही. ते त्यांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. या हंगामादरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या (ms dhoni) भविष्याबाबतही चर्चा झाली. मात्र शेवटचा साखळी सामना खेळण्याआधी त्याने स्पष्ट केले की तो पुढील हंगाम खेळणार आहे. पण असे असले तरी धोनी पुढीलवर्षी चेन्नईचे कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूला सोपवेल, असे मत भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केले आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात बोलताना संजय बांगर यांनी म्हटले आहे की धोनी फाफ डू प्लेसिसकडे आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईचे कर्णधारपद सोपवेल.(sports)
Must Read
1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर
2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू
3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे
4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी
त्यांनी म्हटले आहे की 'मला जेवढे माहित आहे, त्यानुसार कदाचीत धोनीने (ms dhoni) २०११ नंतर विचार केला होता की त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडावे. परंतु, त्यानंतर त्याला माहित होते की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचे आव्हान असणार आहे आणि त्यावेळी कर्णधारपदाचा उमेदवार तयार नव्हता. म्हणून त्यानेच तो भार उचलला आणि योग्य वेळी त्याने विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवले व त्यानंतरही तो खेळला "
बांगर पुढे म्हणाले, 'त्यामुळे मला असे वाटते की धोनी पुढील वर्षी कर्णधार (चेन्नईचा) नसेल आणि तो कदाचीत खेळाडू म्हणून खेळेल. तो फाफ डू प्लेसिसला कर्णधारपद सोपवेल. कारण आत्ता त्यांच्याकडे कर्णधार म्हणून दुसरा पर्याय नाही. आणि जर तुम्ही लिलावातून किंवा ट्रेडिंग मार्फत खेळाडू घेण्याचा विचार करत असाल तर कोणताही संघ असा खेळाडू मुक्त करणार नाही जो चेन्नईचा कर्णधार बनू शकेल.'आता धोनी पुढील वर्षासाठी नक्की काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.