mountain-trekking-permission-collector-daulat-desai

 आरोग्याच्या नियमांचे पालन करून मर्यादित स्वरूपात जिल्ह्यांतर्गत दुर्ग-डोंगर भटकंतीस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली. त्याबाबतचे पत्र कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट माउंटेनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांना मिळाले आहे. भटकंतीस परवानगी मिळालेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील पहिला असल्याचे सांगण्यात आले. मार्चमध्ये लॉकडाउन झाले. परिणामी, दुर्गवेड्यांच्या भटकंतीला ‘ब्रेक’ लागला. डॉ. अडके यांनी भटकंतीस परवानी मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले होते. 

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

नियम असे :

 भटकंतीच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत.

प्रत्येक सदस्याचे थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक आहे. 
- जादा संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करून वेळेत फरक ठेवावा. 
- प्रत्येकाने तीनपदरी मास्क, साधा कापडी किंवा रूमाल नाक व तोंड झाकून वापरणे आवश्‍यक आहे. 
- आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शारीरिक अंतर राखण्याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी. 
- दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना सहभाग देऊ नये. 
- ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना सहभागी करू नये. 
- स्थानिकांच्या घरात जेवण, मुक्काम करू नये. सदस्यांनी इतरही एकत्रित मुक्काम करू नये. 
- एकमेकांच्या वस्तू (मोबाईल, कॅमेरा) हाताळू नयेत. 
- नियमांचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदींप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. 

गडकोट भटकंती तरुण पिढीला घडविणारा नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी परवानगी मिळाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होईल. मात्र, प्रत्येकाने नियमांच्या पालनात कोणतीही कसूर करू नये.