more-than-5-thousand-new-covid-19-patient

(Coronavirus) राज्यात दिवाळीनंतर आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून 5 ते 6 हजारांच्या दरम्यान रुग्ण वाढत आहे. रविवारी 29 नोव्हेंबरला दिवसभरात रुग्णसंख्येत 5 हजार 544 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोनारुग्णांचा एकूण आकडा हा 18 लाख 20 हजारांच्या वर गेला आहे. तर 85 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 4 हजार 362 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 16 लाख 80 हजार 923 एवढी झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.26 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 91 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्त (Corona) होणं म्हणजे कोरोनाविरोधातील लढा पूर्णपणे जिंकणं असं नाही, असंच गेल्या काही महिन्यांपासून दिसून येतं आहे. कारण कोरोनावर विजय मिळवला तरी खरी लढाई सुरू होते ती त्यानंतर. कारण कोरोनाशी झुंज देताना जितका त्रास होतोय त्यापेक्षाही भयंकर त्रास होतो आहे ती कोरोनावर मात केल्यानंतर. कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणारे पोस्ट कोव्हिड कॉम्प्लिकेशन (POST COVID COMPLICATION) खूपच भयावह आहेत.

दरम्यान, Post covid complications किती डेंजर आहे यासाठी इतर कोणत्या जर्नलमधील अभ्यासाचा पुरावा देण्याची गरज नाही. कारण भारतातच ही भयावह परिस्थिती समोर आली. कोरोना अक्षरश: फुफ्फुस पोखरून काढतो आहे. त्यामुळे फायब्रोसिससारख्या फुफ्फुसाच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाविरोधात युद्ध जिंकलेल्या बड्या नेत्यांनी पोस्ट कोव्हिड कॉम्पिलकेशनमुळेच आपला जीव गमावला आहे. तर काही सध्या याच परिस्थितीशी झुंजत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे भारताप्रमाणेच अमेरिका आणि युरोपातील अनेक रुग्णांना फुप्फुसाच्या (Lungsसमस्येचा सामना करावा लागत आहे. इंडिया नावाच्या एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार तज्ज्ञांनी याला पोस्ट कोविड-19 इंटरस्टिशियल लंग डिजीस (PC-ILD) म्हटलं आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी अधिकतर मध्यम आणि कमी दर्जाच्या संसर्गाचा सामना करीत होते.

यामध्ये केवळ 10 टक्के गंभीर रुग्ण होते. ज्यांना गंभीर कोविड-19 न्युमोनिया झाला आहे. मात्र 5 टक्के लोक असे आहेत ज्यांना एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नावाच्या आजाराचा सामना करीत आहेत. म्हणजे हे 5 ते 10 टक्के लोक आहे, ज्यांना लंग फायब्रोसिसचा (Lung Fibrosis) त्रास जाणवत आहे.