more-covid-19-patient

सर्व देशात कोरोना Corona रुग्णाच्या संख्येत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात आता रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर केरळने देशाची चिंता वाढवली आहे.दररोजच्या रुग्ण संख्येने केरळने (Kerala) महाराष्ट्रालाही (Maharashtra) मागे टाकलं आहे.शनिवारी केरळमध्ये 7,983 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 जणांचा मृत्यू झाला.

त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,20,166वर गेली आहे. तर सध्या राज्यात 91,190 जणांवर उपचार सुरू आहेत.केरळमधला मृत्यूचा आकडा हा 1,484 झाला असून 3,40,324 कोरोनामुक्त झाले आहेत.शनिवारी (31ऑक्टोबर) महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यातली सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली. 74 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43, 911वर गेला आहे.

महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.महाराष्ट्रात एकूण 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्य दर 2.62 एवढा आहे.