mobile-samsung-xiaomi

स्मार्टफोनच्या बाजारात दररोज नवनवीन टेक्नॉलॉजीचे फोन येत असतात. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक कॅमेराकडे कल असतो. केवळ चांगल्या कॅमेऱ्यासाठी फोन घेण्याचा विचार करत असाल तर शाओमी,(Xiaomi) सॅमसंग (Samsung)च्या काही जबरदस्त स्मार्टफोनचा नक्कीच विचार करू शकता.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

XIAOMI MI 10:

Xiaomi Mi 10 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंची फुल एचडी स्क्रीन मिळणार आहे. त्याचबरोबर Super AMOLED डिस्प्ले देखील आहे. मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये एक ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. IUI 11 या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो Octa-core CPU ,dreno 650 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8 GB रॅमसह 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. यात 108MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मायक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. फोनला 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

XIAOMI MI 10T PRO:

Mi 10T Pro मध्ये 144Hz हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, 108MP ट्रिपल कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो. Mi 10T Pro फोनला पुढच्या बाजूला पंच-होल कटआउट दिला आहे.

SAMSUNG GALAXY NOTE 20 ULTRA 5G:

या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंची डिस्प्ले, 108MP कॅमेरा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनला 12GB रॅमसह 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

SAMSUNG GALAXY S20 ULTRA:

S series अंतर्गत सॅमसंगने हा 2020 मधील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या सिरीजमध्ये Galaxy S20, Galaxy S20 आणि Galaxy S20 Ultra स्मार्टफोन मिळणार आहे. या तिन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5G कनेक्टिविटी, 8K व्हिडीओ रिकॉर्डिंग आहे. Galaxy S20 Ultraमध्ये 108 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच सेल्फीसाठी 40 मेगापिक्सल कॅमेरा, 45W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे