messaging-app-whatsapp

  व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या मेसेजिंग ॲपवर एक 'शॉपिंग बटन' (Shopping Button) हे नवं फीचर ॲड केलं आहे. या फीचरमुळे ग्राहकांना बिजनेस कॅटलॉग (Business Catalog) सर्च करण्यात आणि वस्तू आणि इतर सेवांची माहिती मिळवण्यात मदत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज 17.5 कोटी लोक व्हॉट्सॲपच्या बिजनेस अकाउंटमध्ये मेसेज करतात. तर दर महिन्याला चार कोटी लोक बिजनेस कॅटलॉग पाहतात. त्यापैकी 30 लाख लोक भारतातून आहेत.

Must Read

1) आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

2) सेहवागची बुमराहबद्दलची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली

3) अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

4) IPL 2020 : आयपीएलची किंग मुंबईच...

5) Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप

व्हॉट्सॲपने दिलेल्या माहितीनुसार, 'शॉपिंग बटन'द्वारे खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तसंच, लोकांना ऑनलाईन शॉपिंगसाठी उपयुक्त मदत हवी आहे आणि कंपन्यांना विक्रीसाठी डिजिटल माध्यमाची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सॲपच्या नव्या 'शॉपिंग बटन'मुळे लोकांना बिजनेस कॅटलॉग शोधणं सोपं होणार आहे. यामुळे लोकांना समजेल की कोणत्या वस्तू आणि सेवा दिल्या जात आहेत. आतापर्यंत कोणतंही कॅटलॉग पाहण्यासाठी बिजनेस प्रोफाईल क्लिक करण्याची गरज भासत होती. हे WhatsApp Shopping button, बिजनेस अकाउंटसाठी असणार आहे.

कसं काम करणार हे नवं फीचर -

WhatsApp Shopping button युजर्सला कंपनीकडून ऑफर करण्यात येणाऱ्या गुड्स आणि सर्व्हिसेसची माहिती उपलब्ध करून देईल. यापूर्वी लोकांना Business प्रोफाईलवर क्लिक करून बिजनेस कॅटलॉग पाहावं लागत होतं. 

पण आता स्टोरफ्रंट आयकॉनप्रमाणे दिसणाऱ्या शॉपिंग बटनद्वारे माहिती मिळेल की बिजनेस कॅटलॉग उपलब्ध आहे की नाही. त्यानुसार युजर्स थेट प्रोडक्टचं ब्राउजिंग करू शकतात. आणि केवळ एकदा टॅप करून प्रोडक्टबाबत कन्वर्सेशन सुरू करू शकतात.