
Must Read
1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर
3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार
4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”
5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव
तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. ‘नोनू चिडियाने दिग्दर्शित केलेली ही नवी जाहिरात तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय,’असे ही जाहिरात शेअर करताना त्याने लिहिले होते.
मनीषने ही जाहिरात शेअर केली आणि यावरून वाद सुरु झाला. ही जाहिरात काश्मिरीं (Kashmir) च्या भावना दुखावणारी आणि त्यांचा अपमान करणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
‘मनीष पॉल ही जाहिरात अपमानास्पद आहे. ही जाहिरात काश्मिरींच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या पाहुणचारासाठी जगभर ओळखले जातो. मात्र तुम्ही आम्हाला चोर म्हणून दर्शवले. काश्मीरमधील पर्यटकांविरूद्ध गुन्हेगारीचे प्रमाण शून्य टक्के आहे, अशा शब्दांत एका युजरने या जाहिरातीवर संताप व्यक्त केला.