man-drags-traffic-cop-on-car-bonnet-at-sakkardara

देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. आता तर एका गुंडाच्या साथीदाराने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला (traffic police nagpur) कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नागपूर सक्करदरा चौकातील 29 नोव्हेंबर रोजीची ही घटना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. आकाश चव्हाण असे कार चालकाचे नाव आहे. त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी अमोल चिदमवर यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. कारचालक आकाश हा एका गुंडाचा साथीदार आहे.

सक्करदरा चौकात कर्तव्यावर असताना अमोल चिदमवर यांनी आकाशला कार थांबवण्याचा इशारा केला होता. कारला पूर्णपणे काळ्या काचा लावण्यात होत्या. अमोल चिदमवर यांनी कार थांबवण्यास सांगितले असता आकाश याने त्यांना जुमानले नाही आणि कार तशीच सुसाट पळवली. अमोल चिदमवर यांनी पुन्हा एकदा त्याला हटकले असता त्याने त्यांच्या अंगावरच कार चढवून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रसंगवधान राखत अमोल यांनी कारच्या बोनेटवर उडी घेतली.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

आरोपी आकाशने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. याच दरम्यान, चौकात दोन दुचाकीनाही त्याने धडक दिली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. अखेर, चौकात वाहतूक कोंडी झाल्यामुळे आरोपी आकाशला कार थांबवावी लागली. त्यानंतर आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.