love-with-actress-alia-bhatt

अभिनेता रणबीर कपूर  Ranbir Kapoor आणि अभिनेत्री आलिया भट्ट  alia bhatt हे सध्याच्या घडीला सर्वांचं लक्ष वेधणारं सेलिब्रिटी कपल आहे. आलिया आणि रणबीर दोन वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांसोबत आहेत. या नात्याविषयी आलिया अनेकदा बोललीही आहे. पण, मितभाशी रणबीर तिच्यासोबतच्या या प्रेमाच्या नात्याविषयी पहिल्यांदा तेव्हा बोलला होता, जेव्हा त्यांचं प्रेम नुकतंच बहरण्यास सुरुवात झाली होती. 

असं म्हटलं जातं की, एका मुलाखतीत रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या नात्याबाबत बोलताना तिच्यासमवेत असणारं आपलं रिलेशनशिप relationship हे अगदीच नवं असून त्याबाबत फार काही बोलायचं नाही, असं म्हणाला होता. 

Must Read

1) भाजपसाठी निवडणूक झाली अवघड?

2) शिवसेनेसाठी धोक्याची घंटा?

3) 2020मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द माहितीये?

4) भाजप आमदाराची महिला नगरसेविकेला धक्काबुक्की, VIDEO

5) रोहित शर्मा नाही 'हा' आहे मुंबई इंडियन्सचा खरा मास्टरमाईंड

6) विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे भडकले चाहते

अतिशय खास अशा या नात्याला फुलण्यास, बहरण्यास वेळ देण्याची गरज असल्याची बाब त्यानं पुढे केली होती. आलियाचं आपल्या जीवनात असणारं स्थान नेमकं काय स्वरुपाचं आहे, यावरुनही त्यानं पडदा उचलला होता. पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची भावना नेमकी कशी असते याबाबतही रणबीर या मुलाखतीत बोलला होता. नवी व्यक्ती, नवे स्वभाव, काही जुन्या गोष्टींमध्येही येणारं नाविण्य हे मुद्दे त्यानं अधोरेखित केले होते. आपण या नात्यांकडे अतिशय सकारात्मक आणि संतुलित दृष्टीकोनातून पाहत असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

दीपिका पदुकोण deepika padukone आणि कतरिना कैफ katrina kaif  यांच्यासोबतच्या नात्यानंतर रणबीरच्या आयुष्यात आलियाच्या रुपात एक नवं वळण आलं. मुख्य म्हणजे आता तो जीवनात बराच पुढे आल्यामुळं, येत्या काळात आलिया आणि रणबीर विवाहबंधनात केव्हा अडकणार याचीच उत्सुकता चाहत्याना लागली आहे.