Love storyLove story- पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच घेतलेली आहे. या प्रेमाची आठवण विसरता विसरत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. असे फारच थोडे नशिबवान असतात ज्यांना हे प्रेम लाभतं. जगात दुर्दैवी लोकांचीच संख्या जास्त आहे. हे सगळं आठवण्याचं  कारण म्हणजे आमचा मित्र राहुल (नाव बदलेलं)! काल मला भेटायला आल्यावर प्रेमाचा विषय निघाला आणि त्याची लव्हस्टोरी डोळ्यांसमोरून गेली. 

आम्ही बारावीला असतानाची गोष्ट आहे. वर्गामध्ये राहुल माझ्या बाजूला बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्रही झाला होता. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. घरची परिस्थिती पण चांगली होती. पहिल्या दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला. कॉलेज सुटल्यावर आम्ही खूप धमाल करायचो. 

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ


आमच्या शेजारच्या वर्गामध्ये एक सुंदर मुलगी होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजूक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. तिचे नाव तृप्ती (नाव बदलेलं)! तृप्ती आणि राहुल एकाच सोसायटीमध्ये राहायला होते. तृप्तीचे वडील कर्जत पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. राहुलमुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राहूल, तृप्ती आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. 

लेक्चर सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राहूलचे तृप्तीकडे पाहणे आणि तीने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी (friends) नाही तर लायब्ररीची पुस्तके. जरी मोबाईलची सुरुवात झाली असली तरी तो मोठ्या शहरांपर्यंतच सीमित होता. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजून उघडपणे साजऱ्या होत नव्हत्या. त्यामुळे एखादी मुलीबरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायची. 

अशा परिस्थितीत राहुल आणि तृप्ती यांच्या प्रेमाच्या (Love story) चॅप्टरला सुरुवात झाली होती. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर तृप्तीने हळूच लाजून मान खाली घालणे, क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राहुल उशिरा आला की तृप्तीचे  क्लासच्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राहुलने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राहूल आत येऊन जागेवर बसेपर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. 

एकदा राहूल बसला की मग तो तृप्तीकडे पाहायचा. मग ती खुणेनेच विचारायची, ‘ का रे? कुठे होता ?’ तो  मग मान हलवून सांगायचा, "असचं!”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला काही करता येत नव्हते. 

तरीही आम्ही त्यांना स्पेस देण्यास कधीच सुरुवात केली होती. एकत्र बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राहुलच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने तृप्तीची कळी खलून यायची. हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत असे. तर तिचे लाजणे बघुन राहूलची गाडी एकदम जाम खुष होऊन जायची. कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळे जण तृप्तीच्या घराच्या कॉर्नरपर्यंत चालत जायचो. रस्त्याने ग्रुपमधील इतर सर्व पुढे चालायचो आणि हे दोघे मागे जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण पुढे नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकांकडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. 

दोघांचे प्रेम आता खऱ्या अर्थाने फुलू लागले होते पण अजूनही एकमेकांना त्यांची जाणीव होऊन दिली नव्हती. एक दिवशी संध्याकाळी मी राहुलला भेटायला त्याच्या घरी गेलो. त्यावेळेस तो खूप अस्वस्थ वाटत होता. राहुलने खाली बसतोय नाही तोपर्यंत मला सांगितले कि आज मला करमत नाही रे! मला सारखी तृप्तीची आठवण येते. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिने मला दिलेलं पुस्तक घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही. हीच गोष्ट तिच्याबरोबर घडत असेल का?  मी म्हटले, ‘मित्रा! तुला प्रेम  (love) झालेय. 

तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया.....


पुढील भाग - Love Story-  पहिलं प्रेम नेहमीच का फसतं..? (part 2)