legislative-council-elections-will-decide

विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे.  पाचही जागांवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadiआणि भाजपा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत रंगण्याची संकेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद समाेर येणार असल्याने भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकाेनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याचीच चिन्हे आहेत.

राज्यातील नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत, तर या पाच मतदारसंघांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे व औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी तर नागपूरची जागा काँग्रेस लढवत आहे. 

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

शिक्षक मतदारसंघात पुण्याची काँग्रेस व अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिला आहे. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक व पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी, भाजपा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आला आहे. 

या दाेन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजपा विराेधात महाविकास आघाडी, अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय-पराजय हा भाजपापेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. 

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला तर, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद अजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. 


भाजपामध्ये 
सबकुछ फडणवीस
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी भाजपाचे उमदेवार ठरविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपामध्ये फडणवीस यांचे स्थान अधिकच बळकट झाले आहे. विशेषत: नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ठरविताना फडणवीस यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य यामुळे पक्षात त्यांचा शब्द अंतिम हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.