laxmii film

बॉलिवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. ‘लक्ष्मी’ हा चित्रपट परदेशातील काही चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शत करण्यात आला होता. आता या चित्रपटाने किती कमाई केली हे समोर आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत अक्षय कुमारचा लक्ष्मी हा बॉलिवूडमधील (bollywood) पहिला चित्रपट आहे जो वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

पुढे आणखी एक ट्विट करत लक्ष्मी चित्रपटाने केलेल्या कमाई विषयी माहिती दिली आहे. लक्ष्मी चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे प्रदर्शित झाला. ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाने ४०.०९ लाख रुपये कमाई केली.
लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्याच अडकला होता. करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसेच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला होता. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवण्यात आले.

‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.