firecrackers


दिवाळी म्हणलं की फराळाची रेलचेल, पणत्यांची रोषणाई अन्‌ बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्र असणारी फटाक्‍याची आतषबाजी. परंतू मोठ्या आवाजाच्या आणि प्रदुषण करणाऱ्या फटाक्‍यांना टाळून यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतलाय, पण मग मुलांच्या हट्टाचं काय? तर त्यावर पर्याय म्हणून यंदा बच्चे कंपनीसाठी चॉकलेट फटाके (firecrackers) मिठाईचे आगमन झाले आहे. मंगळवारपेठतील संतोष व प्राजक्ता शिंदे या दाम्पत्यांनी फटाक्‍याच्या प्रतिकृतीचे चॉकलेट बनवण्याच्या प्रयोग केला आहे. याला बच्चे कंपनी कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

लॉकडाऊनमध्ये (lockdown) शिंदे दाम्पत्याची पुण्यातील नोकरी गेली आणि त्यांना कोल्हापूरला परतावं लागलं. या दिवाळीत बसुन काय करायचं असा विचार करताना फटाके (firecrackersसारखी दिसणारे चॉकलेट बनवण्याची कल्पना सुचली. चॉकलेट पेस्ट, सुका मेवा, मिल्क पावडर साहित्य खरेदी करून घरीच बनविण्यास सुरूवात केली. फटाक्‍याच्या आकाराच्या साच्यामध्ये चॉकलेटचा आकार दिला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. रॉकेट, बॉम्ब, बंदुक, भुईचक्कर अशा विविध फटाक्‍याच्या प्रतिकृती चॉकलेट मध्ये बनवल्या. त्यांना रंगबेरंगी कागदात पॅक करून याचे गिफ्ट बॉक्‍स तयार केले आहेत. 

या चॉकलेट (sweet) फटाकाचे फोटो त्यांनी व्हॉट्‌स ऍप, फेसबुकवर टाकताच लोकांकडून याची विचारणा होऊ लागली. लोकांच्या मागणीला प्रतिसाद देत अधिक चॉकलेटची निर्मिती त्यांनी सुरु केली आहे. नातेवाईक, मित्र परिवारासह शहरातील लोकांकडून त्यांना सध्या ऑर्डर्स मिळत आहेत. लहान मुलांना फटाक्‍यांपासून दूर ठेवत हे चॉकलेट फटाके गिफ्ट देण्याला पसंती दिली जात आहे. तसेच पाहुण्यांना ऑफीस मधिल सहकार्यांना भेट देण्यासाठी देखील हे पॅकेट दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदुषण टाळण्यासाठी या चॉकलेट फटाक्‍यांच्या निर्मितीचा शिंदे दाम्पत्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.