kolhapurreal clear politics- कोल्हापूर  (kolhapur)महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मदत या आठवडय़ात संपत आहे. करोना संसर्गाची साथ नसती तर एव्हाना निवडणुकीचा बार उडाला असता. आता निवडणुकीला दोन महिन्यांचा अवधी असला तरी दिवाळीतच (diwali) निवडणूक प्रचाराचे फटाके फुटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण केले जाणार असा दावा केला जात होता. 

आता आघाडीतील प्रत्येक पक्षाने प्रचाराचा जणू नारळ फोडला असल्याने ही शक्यता मावळली आहे. भाजपनेही महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil), महाडिक परिवार आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे.

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ


कोल्हापूर महापालिकेची पाच वर्षांपूर्वी ८१ जागांसाठी निवडणूक झाली असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप – ताराराणी आघाडी व शिवसेना यांनी स्वबळ अजमावले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निकाल लागला. काँग्रेस -२७, राष्ट्रवादी -१५, भाजप -१३, महाडिक प्रणीत ताराराणी आघाडी १९, शिवसेना ४ व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल राहिले. (real clear politics)

काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. शिवसेना सत्तेच्या बाजूने राहिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा महापालिकेत ‘चमत्कार’ होईल, अशी भाषा केली, पण तो अखेपर्यंत दिसला नाही. स्थायी समिती सभापती निवडणुकीत एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीला बेसावध ठेवत भाजपने आशीष ढवळे यांना निवडून आणले; हा एक अपवाद वगळता भाजप – ताराराणीला विरोधक म्हणूनच भूमिका बजवावी लागली.