graduation election


kolhapur- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक (election) अंतिम टप्प्यात पोहोचली असून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि भाजप महायुती या दोन्ही पक्षांचे उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. जरी दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील असले तरी त्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

गेली बारा वर्षे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोल्हापूरकडे होते. यावेळी मात्र या मतदारसंघातून दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला (election)आहे.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

विजयासाठी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसली कंबर 

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून आणण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. महाविकास आघाडीकडून पदवीधर मतदारसंघातील अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयासाठी मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif), पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मंत्री मुश्रीफ व आ. चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा अद्याप थांबलेला नाही. उलट मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ यांनी आ. पाटील यांच्यावर अधिक आक्रमकपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आ. चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आ. पाटील यांना हा मतदार भाजपकडे राखायचा आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीला हा मतदारसंघ स्वत:कडे खेचून घ्यायचा आहे.